छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): महानगरपालिकेची सलग तिसऱ्या दिवशी प्लास्टिक विरोधात धडक कारवाई केली. विविध छोट्यामोठ्या प्लास्टिक व्यावसायिकांच्या दुकानांवर व गोडाऊनवर धडक कारवाईमध्ये १००० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक जप्त करण्यात आले. अनेक कारवाईमध्ये ३७ हजार रुपये दंड आकारण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून चालू असलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत ११००० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक जप्त केले आहे. ज्यात जवळपास ४० लाख पिशव्या तसेच अनेक वस्तू वापरात येण्यापासून रोखण्यात मनपाला यश आले आहे.
मोठ्या कारवायांचा धडाका कायम
मोठ्या कारवायांचा धडाका कायम राहणार असून गेल्या काही दिवसांत महानगरपालिकेकडून शहरातील विविध भागांत अचानक छापेमारी करून हजारो किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात आले आहे. सातत्यपूर्ण कारवायांमुळे नियमभंग करणाऱ्या छोट्यामोठ्या सर्व व्यवसायिकांमध्ये
मोठी खळबळ उडाली असून, मनपाने आपली भूमिका अधिकच आक्रमक केली आहे. नियमभंग आढळल्यास अचानक छापेमारी करून दंडात्मक कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुसार साठा जप्ती, दंड आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
जनजागृती करणार
महानगरपालिका उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की, शहरात प्रतिबंधित प्लास्टिक विक्रेत्याविरोधात नियमितपणे कारवाई करणे चालू राहणार असून नागरिकांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापरबंद करण्यासाठी जनजागृती होते.
करण्यात येणार असल्याचे सांगितले. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार व उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त रमेश मोरे, नागरी मित्र पथक कर्मचारी देविदास सुसर, बालाजी साबळे, सुवर्णसिंग परदेशी, जनार्दन सांगळे, यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी पथकासोबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता अधिकारी अनिल जाधव, स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ, वंदना पवार, रीमा मलके, तसेच स्वच्छता कर्मचारी उपस्थित
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions















